किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile
किरण...

@coolkiranj

सावलीची आस ना कोवळसे ऊन मी, सूर नाही संगती एक तरीही धून मी, ज्यात डोकावेंन मी ते मनाचे बिंब मी, जो पुरेल जन्म सारा, तो सोबतीचा चंग मी.! #मैत्रीजपणारा #राजसमर्थक

ID: 77934784

linkhttps://twitter.com/search?q=from%3A%40coolkiranj%20-filter%3Amentions&s=09 calendar_today28-09-2009 05:31:11

148,148K Tweet

20,20K Followers

739 Following

किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

मातोश्री सईबाई....!!! शंभू राजांचा जन्म झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती, शंभू राजे २ वर्षांचे असतानाच आपल्या मातोश्रींपासून दुरावले होते. पुढे शंभू राजांना त्यांच्या आज्जी व छत्रपती शिवरायांच्या मातोश्री " जिजाऊ आऊसाहेब " यांनी घडवले. 1️⃣

मातोश्री सईबाई....!!!
शंभू राजांचा जन्म झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती, शंभू राजे २ वर्षांचे असतानाच आपल्या मातोश्रींपासून दुरावले होते. 
पुढे शंभू राजांना त्यांच्या आज्जी व छत्रपती शिवरायांच्या मातोश्री " जिजाऊ आऊसाहेब " यांनी घडवले. 1️⃣
किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

शंभूराजांच्या जन्मानंतर सईबाई राणी साहेब अंथरुणाला खिळल्या. देव पाण्यात ठेवणे, देवाला कौल लावणे, देशोदेशीचे वैद्य सारे करून झाले परंतू कशाचाच निभाव लागत नव्हता सईबाइंची प्रकृती खालावतच होती, तिकडे स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या खानाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. 2️⃣

किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

अशा परिस्थितीतच हवा पालट म्हणून दि. ११ जुलै १६५९ रोजी राजे, आऊसाहेब आणि सईबाई यांसमवेत प्रतापगडी आले. सईबाईंच्या आजाराने महाराज थोडे चिंतेत असत. पण तलवारी संग लगीन लागलेल्या राजांना आपल्या भावविश्वात रमायला तरी वेळ होता कुठे, अखंड रयतेचा विचार करणारे राजे त्यांना उसंत ती कुठली.3️⃣

किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

खानाशी कसे झुंजावे, कोणास काय कामगिरी द्यावी सारी सारी खलबत राजांच्या डोक्यात चालू त्यातच कुठेतरी सईबाईंचा विचार मनास डंक लावून जाई. सईबाई म्हणजे राजांच्या लहानपणातील सवंगडी.एकत्र खेळणे, बागडणे, भांडणे, रुसवे -फुगवे अशा कैक कैक गोष्टी. हवा बदलीचा सुद्धा काही परिणाम दिसत नव्हता.4️⃣

किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

म्हणून सईबाई आणि आऊसाहेब परत राजगडी आले. राजगडाहून राणीसाहेबांच्या प्रकृतीच्या बातम्या सतत प्रतापगडी जात असत. राजगडाहून येणारा प्रत्येक संदेश. राजांच्या मनाला घर पाडत असे. एक दिवस राजांना आलेल्या खलीत्यात त्यांना राजगडी भेटीस बोलावले आणि राजे गेले देखील. 5️⃣

किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

गडावरील हवा सहन होत नव्हती म्हणून शिवापटण इथे एक वाडा राजेंनी बांधला होता. सईबाई इथेच असत. राजे भेटीला आले आणि भेटून गेले सुद्धा. राजे आणि राणीसाहेब यांच्यातील संभाषण ऐकले ते इतिहाने. प्रतापगडी खानाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी सुरु झाली. 6️⃣

किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

महाराजांच्या आज्ञेनुसार सर्व मुत्सद्दी प्रतापगडी पोहोचले. मावळखोरी महाराजांच्या बाजूने लढणार ही उत्साहवर्धक वार्ताही गडावर पोहोचली. श्री जगदंबा महाराजांच्या पाठीशी उभी आहे असा विश्वास सर्वांच्या मनी दुणावू लागला. नेमक्या याचवेळी सईबाईसाहेबांची प्रकृती पार ढासळली. 7️⃣

किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

सर्वतोपरी प्रयत्न करूनही अखेर विधी - लिखित टळले नाही आणि भाद्रपद वद्य अमावसेच्या फक्त एक दिवस आधी म्हणजे भाद्रपद वद्य चतुर्दशीला (दिनांक ५ सप्टेंबर १६५९ रोजी) सरत्या पावसाला शिवाजीराजांचा भावगड ढासळला... एक मनाजोगा जमलेला मनसुबा वाहून गेला. 8️⃣

किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

भरल्या मळवटाने सईबाई, महाराजांना आणि अवघ्या सव्वा दोन वर्षाच्या लहानग्या शंभूराजांना सोडून ना परतिच्या मोहिमेला निघून गेल्या !!! सईबाई महाराणींना मानाचा मुजरा 💐💐 #साभार 9️⃣

Sachin Tendulkar (@sachin_rt) 's Twitter Profile Photo

𝙈𝙚𝙙𝙖𝙡𝙨 𝙈𝙤𝙣𝙙𝙖𝙮! 🥇🥈🥉 What a historic day we had at the Paris Paralympics yesterday. Indians, across various sports, won 8 medals, including 2 golds, 3 silvers, and 3 bronzes. Congratulations to all the winners who flew the Indian flag high, making it the most

𝙈𝙚𝙙𝙖𝙡𝙨 𝙈𝙤𝙣𝙙𝙖𝙮! 🥇🥈🥉

What a historic day we had at the Paris Paralympics yesterday. Indians, across various sports, won 8 medals, including 2 golds, 3 silvers, and 3 bronzes.

Congratulations to all the winners who flew the Indian flag high, making it the most
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

सस्नेह जय महाराष्ट्र, गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे.

क्रीडाजगत (@kreedajagat) 's Twitter Profile Photo

सांगलीचा पठ्ठ्या 'सचिन सर्जेराव खिलारी' पॅराऑलिंपिक मध्ये रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे. 🇮🇳🥈 आटपाडी तालुक्यातील करगणी गावच्या सचिनने गोळाफेक F 46 प्रकारात १६.३२ मी फेक करत आशियाई विक्रमासह रुपेरी कामगिरी केली.👏 हे पॅरिस पॅराऑलिंपिक मधील भारताचे २१ वे पदक आहे. हार्दिक अभिनंदन

सांगलीचा पठ्ठ्या 'सचिन सर्जेराव खिलारी'  पॅराऑलिंपिक मध्ये रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे. 🇮🇳🥈
आटपाडी तालुक्यातील करगणी गावच्या सचिनने गोळाफेक F 46 प्रकारात १६.३२ मी फेक करत आशियाई विक्रमासह रुपेरी कामगिरी केली.👏
हे पॅरिस पॅराऑलिंपिक मधील भारताचे २१ वे पदक आहे. 
हार्दिक अभिनंदन
सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

"राजलक्ष्मी अलंकृत,वज्रचुडेमंडीत,अखंड सौभाग्यवती श्रीमंत राणीसरकार महाराणी सईबाईसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन." 🙌🙏🚩 #महाराणी

"राजलक्ष्मी अलंकृत,वज्रचुडेमंडीत,अखंड सौभाग्यवती श्रीमंत राणीसरकार महाराणी सईबाईसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन." 🙌🙏🚩

#महाराणी
Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

झिम्मा च्या टीम कडून नवी भेट… तुमच्या आमच्यातल्या सगळ्या भावंडांची… सोनू… पप्पू… तायडी आणि त्यांच्या इरसाल कुटुंबाची खुळ्यासारखी फसक्लास श्टोरी!  १५ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या ‘फसक्लास’ चित्रपटगृहात! #FussclassDabhade #FD #FDInCinemas15November

किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि l तन्नो दन्ती प्रचोदयात।। सर्वांना गणेशोत्सवाच्या मनः पूर्वक शुभेच्छा. #गणेशचतुर्थी 🌺🌺 #माझाबाप्पा

ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि l  
तन्नो दन्ती प्रचोदयात।।
सर्वांना गणेशोत्सवाच्या मनः पूर्वक शुभेच्छा. 
#गणेशचतुर्थी 🌺🌺 #माझाबाप्पा
तेजस शिंदे (@tejasshinde002) 's Twitter Profile Photo

*राज ठाकरेंची महाराष्ट्राला गरज आहे, पण नेमकं कशासाठी?* महाराष्ट्राला राज ठाकरेंची गरज आहे. राज ठाकरे एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवेत असं आपण वारंवार ऐकतो. इतकंच काय तर स्वतः राज ठाकरेंनीसुद्धा अनेकदा फक्त एकदा या महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात द्या असं आवाहन

*राज ठाकरेंची महाराष्ट्राला गरज आहे, पण नेमकं कशासाठी?*

महाराष्ट्राला राज ठाकरेंची गरज आहे. राज ठाकरे एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवेत असं आपण वारंवार ऐकतो. इतकंच काय तर स्वतः राज ठाकरेंनीसुद्धा अनेकदा फक्त एकदा या महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात द्या असं आवाहन
TEJASWWINI (@tejaswwini) 's Twitter Profile Photo

‘येक नंबर’ टिझर येत आहे, उद्या !! १० ऑक्टोबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!!

किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

Fake News.. लोकं लाईक साठी काय वाटेल ते खोटं बोलत असतात.

TEJASWWINI (@tejaswwini) 's Twitter Profile Photo

आता आवाज फक्त ‘येकच’..! bit.ly/YekNumberTeaser 'येक नंबर' १० ऑक्टोबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात !! #YekNumber #YekNumber #YekNumberInCinemas10October Zee Studios Warda S Nadiadwala 🐎 T-Series Nadiadwala Grandson