Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profileg
Anil Shidore अनिल शिदोरे

@anilshidore

नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना https://t.co/njFv7P6A76, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI https://t.co/ECyumXcTcF

ID:89396354

linkhttp://anil-shidore.blogspot.in calendar_today12-11-2009 07:26:23

19,6K Tweets

60,3K Followers

99 Following

Harshal Ghanekar(@HarshalG9) 's Twitter Profile Photo

*फॉक्सकॉन* नंतर अजून एक प्रकल्प (सी-२९५ एअरक्राफ्ट) जो नागपुरात होणार होता तो आता *गुजरात (बडोदा)* मध्ये होणार.
Nayan Kadam Anil Shidore अनिल शिदोरे प्रसाद कुलापकर MNS Adhikrut - मनसे अधिकृत

*फॉक्सकॉन* नंतर अजून एक प्रकल्प (सी-२९५ एअरक्राफ्ट) जो नागपुरात होणार होता तो आता *गुजरात (बडोदा)* मध्ये होणार. @Nayan7217_ @anilshidore @PrasadKulapkar @mnsadhikrut
account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य मिळालं तेंव्हाच्या ध्येयवादी, विचारी, अभ्यासू मंडळींचं पुढे काय झालं, त्यांची राज्यकर्त्यांशी नाळ कुठे, कशी तुटली ह्यावर विनय हर्डीकरांनी 'मौज' च्या दिवाळी अंकात पु.ग. सहस्रबुध्द्यांवरच्या लेखात लिहिलं आहे.. त्यातून आजच्या परिस्थितीचंही आकलन होतं..

account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात एक विलक्षण वस्तुसंग्रहालय सुरू झालं आहे. दगडांचं, पाषाणांचं, पत्थरांचं वस्तुसंग्रहालय (Geology Museum).. १८९२ साली बांधलेल्या एका वास्तुत २२,००० प्रकारच्या दगडांचा हा संग्रह आहे.. हे म्हणे तुम्ही बघू तर शकताच पण हाताळूही शकता..

account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

सांगलीमधल्या काही गावांत सायंकाळी ७ः०० वाजता सायरन वाजतो आणि नंतर एक तासभर गावात “डिजीटल ब्लॅकआऊट” पाळला जातो. टिव्ही, मोबाईल, संगणकाचे पडदे बंद.. मुलांचा अभ्यास व्हावा, एकाग्रचित्त व्हावं म्हणून सगळं गाव तसं करतं. उत्तम कल्पना..मलाही स्वतःसाठी असंच काही करावं वाटू लागलं आहे.

account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात (National Curriculum Framework) मातृभाषेतूनच शिकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा आग्रह निश्चित चांगला आहे.. देशानं अगदी सत्वर ह्या मार्गानं गेलं पाहिजे.

account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध नागरी संघटना, सहकारी गृहरचना संस्थांनी पुरेसं पाणी मिळत नाही म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे. धरणं भरली आहेत पण त्यांना पाणी विकत आणण्यासाठी दरवर्षी ३००/४०० कोटी खर्च करावे लागतात, ते का? असा त्यांचा प्रश्न आहे.. पुढची सुनावणी २९ नोव्हेंबरला.

account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

ह्यावर काही शासन निर्णय आला का? तसेच आजच्या मंत्रीमंडळात ह्यावर काही चर्चा झाली का?

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि 'ओला दुष्काळ' जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. CMO Maharashtra

ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि 'ओला दुष्काळ' जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. @CMOMaharashtra
account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

दत्ता माझ्याबरोबर काम करतो. त्याला कुटुंबाला घेऊन दिवाळीसाठी गावी जायचं आहे. एसटी च्या बसेस पुरेशा नाहीत आणि खाजगी बसेस अव्वाच्यासव्वा भाडं आकारत आहेत.. जाणं परवडणार नाही म्हणतो.. सरकार खाजगी बसचालकांच्या नफेखोरीवर चाप लावणार का? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis

account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

अंगणवाडी सेविका ग्रॅच्युईटीस पात्र आहेत असा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला. तो देताना न्यायालयानं जी निरीक्षणं नोंदवली आहेत त्यानं अनेक योजना-कर्मचारी असलेल्यांना दिलासा मिळणार आहे.. तसा कायदा करावा असंही न्यायालयानं सुचवलं आहे.. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis

account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

दिवाळीच्या आदल्या आठवड्यात इतका जोरदार सलग अनेक दिवस पाऊस हे विचित्र आहे.. निसर्गचक्र बिघडलंय, समतोल ढळलाय.. आणि, आपण म्हणणार इतक्या मोठ्या प्रश्नावर मी एक माणूस काय करणार? .. पण तसं म्हणू नये कारण .. प्रश्न कितीही मोठा असला तरी माणसाचा “विवेक” आणि सामुहिक शहाणपण मार्ग काढेलच.

account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

चीननी केलेल्या लोकसंख्या नियंत्रणाबाबत आपण नेहमी बोलतो,ऐकतो. त्यांच्या सत्ताधारी पक्षानं परवाच्या अधिवेशनात लोकसंख्या फार कमी असणं चांगलं नाही म्हणून जन्मदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसंख्या म्हणजे फक्त 'ओझं' नसतं, ती लोकसंख्या सुदृढ, शिक्षीत असेल तर ती जमेची बाजूही असते..

account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

सरकार म्हणतं आहे त्यापेक्षा शेतकरी आत्महत्या अधिक असाव्यात असं पंजाब कृषी विद्यापीठाचा हा अहवाल सुचवतो आहे.. बाकी देशात काय परिस्थिती असावी ह्याचा गावोगाव फिरून कुणी अभ्यास केला आहे का?

account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

मुंबईत तुफान पाऊस आहे. प्रचंड गडगडाटासह मोठ्या थेंबांचा.. अगदी ढगफुटी नव्हे पण तसाच (फार पूर्वी नागपूर गडचिरोली रस्त्यावर ढगफुटी पाहिली होती). मात्र हे जरा विचित्र आहे. दिपावलीच्या सुमारास एखाद दुसरा पाऊस येतो, मोठाही असतो पण हे विचित्र आहे. शास्त्रज्ञांनी ह्यावर प्रकाश टाकावा.

account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

पुण्याजवळ हिंजवडी, रावेतच्या आसपास 'नवं पुणं' उभं रहातंय. तिथे नेहमी जाणं होतं.. उंच उंच इमारतीनी वेढलेल्या ह्या भागात मोकळ्या जागा, मैदानं, क्रिडांगणं, बागा फार कमी आहेत.. हे असं का? हा प्रश्न नागरिकांनी येत्या निवडणुकीत सत्ताधारी नगरसेवकांना विचारला पाहिजे..

account_circle